जैन मुनींच्या हत्येचा निषेध : भुसावळात उद्या सकल जैन समाजाचा मोर्चा
Protest against killing of Jain sages: All Jain community will march tomorrow in Bhusawal भुसावळ : कर्नाटक येथे काही समाज कंटकांनी जैन मुनी आचार्य 108 श्री कामकुमार नंदीजी महाराज यांचे अपहरण केल्यानंतर नंतर निर्घृण हत्या करण्यात आल्याची बाब उघडकीस आल्यानंतर या घटनेचा देशभरातून निषेध केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ सकल जैन समाज भुसावळतर्फे दिगंबर जैन मंदिर, आठवडे बाजार ते तहसील कार्यालयादरम्यान निषेध मोर्चा मंगळवारी दुपारी तीन वाजता काढण्यात येणार आहे.
प्रशासनाने जैन मुनींची हत्या करणार्या दोषींवर कठोर कारवाई करावी व संत-महंतांना सुरक्षा पुरवावी, अशी मागणी करण्यात आली. शहरातील सर्व धर्मप्रेमी बांधवांनी मोर्चात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सकल जैन समाज भुसावळतर्फे करण्यात आले आहे.

