खडका येथे धाडसी घरफोडी : 69 हजारांचा ऐवज लंपास
Daring burglary at Khadka : 69 thousand instead of loot भुसावळ : शहराजवळील खडका येथील अक्सा कॉलनीतील बंद घरातून चोरट्यांनी सुमारे 69 हजारांचा ऐवज लांबवल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बाजारभावानुसार पावणेचार लाखांचा ऐवज
शेख मेहमूद शेख हुसेन (34, अक्सा कॉलनी, पेट्रोल पंपामागे, खडका) हे इंजिन मेकॅनिक असून 15 ते 16 दरम्यान गावाला गेल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. शौचालयाच्या खिडकीचे तावदाने तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करीत 27 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, 18 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, तीन ग्रॅमची सोन्याची अंगठी, 10 ग्रॅमचा गळ्यातील सोन्याचा हार व 25 हजारांची रोकड असा एकूण 68 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवली. दरम्यान, चोरट्यांनी एकूण 68 ग्रॅम सोन्याचे दागिणे लांबवले असून त्याचे आजचे बाजारमूल्य पावणेचार लाखांच्या घरात आहे तर पोलिसांनी मात्र पंचनाम्यात सोन्याचे दर जुने लावल्याने एकूण 68 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे सांगण्यात आले. तपास एएसआय शामकुमार मोरे करीत आहेत.
