अंजनसोंडे येथे महिलेचा विनयभंग करीत मारहाण
Woman molested and beaten at Anjansonde भुसावळ : तालुक्यातील अंजनसोंडे येथे महिलेसह तिच्या भाच्याला जुन्या वादातून संशयितांनी बेदम ममारहाण केली तसेच महिलेचा विनयभंग केला. ही घटना शुक्रवार, 14 रोजी रात्री साडेआठ वाजता घडली.
यांच्याविरोधात गुन्हा दाखल
महिलेवर जळगाव येथे उपचार सुरू असल्याने प्रकृती बरी झाल्यानंतर महिलेने वरणगाव पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यानंतर संशयित शांताराम पाटील, दीपक पाटील, दीपक पाटीलचा लहान भाऊ, (सर्व रा.अंजनसोंडा) व संदीप पाटील (नाव, गाव पूर्ण माहित नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील करीत आहेत.
