भुसावळातील महिलेवर हल्ला करणार्याचा कसून शोध
A thorough search for the attacker of the woman in Bhusawal भुसावळ : तालुक्यातील खडका गावाजवळील बंद असलेल्या मिलच्या आवारात 59 वर्षीय महिलेवर अज्ञाताने हल्ला केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली होती तर महिला निर्वस्त्र आढळल्याने विविध अफवांचे पेव पसरले मात्र महिलेवर अज्ञाताने हल्ला केल्याची तक्रार जखमी महिलेच्या बहिणीने दिल्यानंतर अज्ञाताविरोधात भुसावळ तालुका पोलिसात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आता अज्ञात हल्लेखोराचा शोध सुरू केला असून महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असून जिल्हा सामान्य रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
हल्लेखोरोचा पोलिसांकडून कसून शोध
खडका येथील बंद सुतगिरणीबाहेर 59 वर्षीय महिला निर्वस्त्र व रक्तबंबाळ अवस्थेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर यंत्रणेने धाव घेतली. जखमी महिलेला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसीसीमध्ये उपचारार्थ हलवण्यात आले तर जखमी महिलेच्या खिरोदास्थित बहिणीचा शोध घेतल्यानंतर तिच्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जखमी महिला पतीपासून गेल्या काही वर्षांपासून विभक्त राहत असून मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करीत असल्याची माहिती आहे. रविवारी सकाळी महिला एकासोबत बाहेर पडताना नागरीकांना पाहिल्यानंतर संबंधिताचा शोध सुरू करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली.
