चिंचोली गावातून घराबाहेर लावलेली पाण्याची मोटार लांबवली
The water motor installed outside the house was extended from Chincholi village यावल : तालुक्यातील चिंचोली या गावात घराबाहेर पाणी भरण्यासाठी लावलेली इलेक्ट्रिकल मोटर चोरी झाली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
घराबाहेरून लांबवली मोटार
चिंचोली, ता.यावल येथील आरती युवराज मिस्त्री यांनी आपल्या घराच्या बाहेर सार्वजनिक पाणीपुरवठयाचे पाणी भरण्यासाठी घराच्या बाहेर इलेक्ट्रिकल मोटार लावली होती. मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात चोरट्याने तीन हजार 400 रुपये किंमतीची मोटार लांबवली. हा प्रकार सकाळी निदर्शनास आला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात आरती मिस्त्री यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नितीन चव्हाण करीत आहे.
