भुसावळात गांजा ओढताना प्रौढावर कारवाई
Action taken against an adult while smoking ganja in Bhasawal भुसावळ : गुंगी येणार्या गांजाचा चिलीममध्ये वापर करून नशा करणार्या 57 वर्षीय प्रौढावर बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने नशेखोरांमध्ये खळबळ उडाली. शहरातील जाममोहल्ला भागातील शालिमार हॉटेलमागे संशयित शेख शाहबुद्दीन शेख मोईनुद्दीन (57, जाम मोहल्ला, भुसावळ) हे रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास नशा करताना आढळल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.
याप्रकरणी कॉन्स्टेबल राहुल वानखेडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून शंभर रुपये किंमतीचा गांजा व चिलीम जप्त करण्यात आली. तपास नाईक शशिकांत तायडे करीत आहेत.
