नायगाव शिवारातून 30 हजारांची दुचाकी लांबवली
A two-wheeler worth 30,000 was extended from Naigaon Shivar मुक्ताईनगर : शेताच्या बांधावर लावलेली 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरट्यांनी लांबवली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकी चोरट्यांची टोळी सक्रिय
दिनकर मधुकर निकम (45, पिंप्रीनांदू) यांनी नायगाव येथील सप्तश्रृंगी मंदिराजवळ 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 ए.व्ही.5326) ही मंगळवार, 11 रोजी सकाळी उभी केली असताना चोरट्यांनी दुपारच्या वेळी संधी साधून दुचाकी लांबवली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेतकर्याने सर्वत्र शोध घेतला मात्र दुचाकीचा तपास न लागल्याने तक्रार नोंदवल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक गजमल पाटील करीत आहेत.
