चिखली येथून दुचाकी लांबवली
मुक्ताईनगर : तालुक्यातील चिखली येथे घराबाहेर लावलेली दुचाकी चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
मारोती प्रल्हाद कांडेलकर (45, दसखेडा, ता.मलकापूर) यांनी आपली 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 डी.के.9069) ही घरासमोर लावली असता रविवार, 16 रोजी मध्यरात्री चोरट्यांनी संधी साधली. तपास एएसआय संजीव पाटील करीत आहेत.
