मुसळधार पाऊस : हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडले


Heavy rain : 41 gates of Hatnoor dam opened भुसावळ : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने यंदाच्या हंगामात धरणाचे पूर्ण 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. हतनूर धरणातून प्रतीसेकंद एक लाख 37 हजार 93 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग होत असून तापी नदीला पूर आला असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मंगळवारी सकाळी आठ ते बुधवारी सकाळी आठ दरम्यान पाणलोट क्षेत्रात तब्बल 459.8 मिली पावसाची नोंद झाल्याचे शाखा अभियंता एस.जी.चौधरी म्हणाले.

धरणाचे पूर्ण दरवाजे उघडले
मंगळवारी रात्रीपासून दमदार पाऊस सुरू असून गेल्या 24 तासांत हतनूरच्या पाणलोटक्षेत्रात 459.8 मिली पावसाची नोंद करण्यात आली तर बुधवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेदरम्यान 161 मिली पाऊस झाला. यामुळे धरणाची जलपातळी सकाळी वाढल्यानंतर बुधवारी दुपारी 12 वाजता धरणाचे 14 दरवाजे तर दुपारी एक वाजता 30 दरवाजे उघडून विसर्ग झाला. मात्र पूर्णा नदीतून मोठ्या प्रमाणात आवक सुरू होताच दुपारी चार वाजता 36 दरवाजांतून विसर्ग झाला. यानंतरही पाण्याची आवक वाढल्याने अखेर सायंकाळी पाच वाजता धरणाचे संपूर्ण 41 दरवाजे उघडून विसर्ग करण्यास सुरूवात झाली. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच संपूर्ण 41 दरवाजे उघडण्यात आले. धरणाची जलपातळी 210.50 मीटर तर जलसाठा 198 दलघमीवर स्थिर आहे. धरणातून प्रतीसेकंद 3 हजार 882 क्युमेक्स तर 1 लाख 37 हजार 93 क्युसेस प्रतीसेकंदाने विसर्ग होत आहे. दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

459 मिलीमीटर पावसाची नोंद
हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात येणार्‍या तापी व पुर्णा नदीच्या खोर्‍यातील बर्‍हाणपूर येथे 4.6, देडतलाई 39, टेक्सा 59.6, गोपाळखेडा 38.2, लखपूरी 44.2, लोहारा 53.4, तर अकोला येथील पर्जन्यमापन केंद्रावर 61.6 असा एकूण 459 मिली पाऊस झाला. मंगळवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत झालेल्या या पावसामुळे तापी व पूर्णा नदीला पूर आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !