मुक्ताईनगर तालुक्यात अतिवृष्टी : ग्रामविकास मंत्री महाजनांसह खासदार रक्षा खडसेंनी केली पाहणी


मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा खुर्द व वढोदा आदी भागात झालेल्या अतिवृष्टीनंतर नुकसानीची पाहणी ग्रामविकास मंत्री गिरी महाजन यांच्यासह खासदार रक्षा खडसे यांनी केली. अतिवृष्टीमुळे मौजे जोंधनखेडा (मुक्ताईनगर) येथील कुंड धरण पूर्ण भरून ओसंडून वाहत असल्याने परीसरातील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर प्रशासकीय अधिकार्‍यांसोबत लोकप्रतिनिधींनी पाहणी करीत सूचना केल्या.

भरपाई मिळवून देणार :  मंत्री महाजन
अतिवृष्टीमुळे मुक्ताईनगर तालुक्यात अनेक गावात उभ्या पिकांचे तसेच राहत्या घरांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी योग्य तो प्रयत्न करणार असल्याबाबत ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व खासदार रक्षा खडसे यांनी नुकसानग्रस्त शेतकरी व नागरीकांशी बोलताना सांगितले.

यांची होती उपस्थिती
यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, राजेंद्र फडके, भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकिशोर महाजन, मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक कांडेलकर, संतोष खोरखेडे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रफुल जवरे, तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे, विनोद पाटील, पं.स.चे माजी सदस्य राजेंद्र सवळे, रवी राजपूत, निखील भोलाणकर, वढोदा सरपंच स्वप्ना खिरडकर, हिंगे, राजूशेट टावरी आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !