विरावली विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बाजीराव पाटील
Bajirao Patil as Chairman of Viravali Various Executive Society यावल : यावल तालुक्यातील विरावली विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बाजीराव पाटील यांची निवड करण्यात आली. सहकार निबंधक कार्यायलाचे अधिकारी के.वी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत निवड झाली. निवडीनंतर विकासोचे माजी चेअरमन अर्जुन पाटील, संस्थेचे व्हा.चेअरमन नरेंद्र सोनवणे, संचालक युवराज पाटील, लीलाधर कोळी, नावरे येथील रमेश पाटील, संजय मोतीराम पाटील, गुलाब पाटील, प्रल्हाद पाटील, कोकिळा पाटील, उषा महाजन, प्रमिला पाटील आदींनी पाटील यांचा गौरव केला. बाजीराव पाटील हे भारतीय डाग विभागाच्या पोस्ट विभागात पोस्टमास्तर म्हणून गेले 35 वर्ष विरावलीत कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले व त्यांनी शेतकरी परीवर्तन पॅनलच्या वतीने निवडणूक लढवली.
यांची निवडीप्रसंगी उपस्थिती
याप्रसंगी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अजय पाटील, माजी चेअरमन संजय पाटील, पवन पाटील, गिरीष पाटील, धीरज महाजन, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, माजी नगराध्यक्ष राकेश कोलते , राष्ट्रवादीचे विधान सभा प्रमुख अनिल साठे, जिल्ह्याउप अध्यक्ष दीपक पाटील, उंटावद विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शशिकांत पाटील, जिल्हा युवक सरचिटणीस विनोद पाटील, राष्ट्रवादी समन्वयक किशोर माळी, युवक कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे, शहर युवक अध्यक्ष हितेश गजरे, दिनकर पाटील, संतोष पाटील, केदार पाटील, नयन पाटील, विजय पाटील, महेश पाटील, विशाल पाटील, युवक तालुकाध्यक्ष देवकांत पाटील , विकासोचे सचिव प्रमोद सुरवाडे व कर्मचारी सिकंदर तडवी आदी उपस्थित होते.

