अतिवृष्टीमुळे बाधीत शेतकर्यांना तातडीने मदत द्या
मुक्ताईनगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रशासनाकडे मागणी
Provide immediate relief to farmers affected by heavy rains मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यात जवळपास सर्व गावांमध्ये 19, 20 आणि 21 जुलै रोजी झालेल्या ढगफुटीसदृश अतिवृष्टी पावसामुळे शेती शिवारातील पिकांचे, घरांचे व गोठ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी मुक्ताईनगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जळगाव जिल्हाधिकारी यांना मुक्ताईनगर तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन देवून करण्यात आली.
शेती पिकांसेह अन्न-धान्याचे नुकसान
निवेदनाचा आशय असा की, 19, 20 आणि 21 जुलै रोजी मुक्ताईनगर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसामुळे तालुक्यातील गावांमध्ये शेती शिवारातील पिकांचे, घरांचे, गोठ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने कुर्हा-वढोदा परीसरात 21 जुलै रोजी झालेल्या ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीमुळे वढोदा, कुर्हा, सुळे, भोटा, रीगाव, धुळे, चिंचखेडा खुर्द, तालखेडा हलखेडा, लालगोटा, जोंधनखेडा, हिवरा, उमरा, पारंबी या व तालुक्यातील इतर गावात घरात पुराचे पाणी शिरल्याने अन्न-धान्यासह जीवनाश्यक वस्तूंचे नुकसान झाले. घरातील किंमती सामान व गुरेढोरे वाहिल्याने घरांची पडझड झाली. शेत-शिवारातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अनेक हेक्टरवरील जमीन पिकांसहित खरडून गेली आहे. शेतांचे बांध फुटले आहेत, काही ठिकाणी शेतात पाणी थांबले असून शेतांची अवस्था तलावाप्रमाणे झाल्याने उभे असलेले पीक पिवळे पडले आहे. नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे करून नुकसानग्रस्तांना त्वरीत नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली.

यांची निवेदन देताना उपस्थिती
निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, शहराध्यक्ष राजेंद्र माळी, युवक शहराध्यक्ष बबलू सापधरे, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य निलेश पाटील, माजी सरपंच प्रवीण पाटील, तालुका सरचिटणीस रवींद्र दांडगे, सुनील काटे, अतुल पाटील, साहेबराव पाटील, दिनकर पाटील, रउफ खान, सोनू पाटील, राहुल पाटील, संदीप ढिवरे, विशाल रोटे, मयूर साठे, मुश्ताक मण्यार, जुबेर अली, अयाज पटेल, फिरोज भांजा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
