भाजपा विचार धारेवर आणि त्यागावर चालणारा पक्ष : अमोल जावळे
लोकसभेला भुसावळ तालुक्यातून 80 हजार मताधिक्याच्या उद्दिष्टाचा संकल्प
भुसावळ : भुसावळ तालुक्यातुन माझे बाबा स्व.हरीभाऊ जावळे यांच्या पहिल्या नोकरीची सुरुवात झाल्याने भुसावळ तालुक्याविषयी मला विशेष आपुलकी आहे. भाजपा हा त्यागावर आणि विचारावर चालणारा पक्ष आहे. मुख्यमंत्री पदाचा त्याग करणारे देवेंद्रजी फडणवीस आणि माझे बाबा यांचे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. 2024 ला मोदिजींचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला सर्वांना पुन्हा एकदिलाने आणि एकजुटीने भुसावळ तालुक्यात संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व ज्येष्ठ, श्रेष्ठ लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाने काम करायचे आहे आणि ह्या वेळेस लोकसभेला भुसावळ तालुक्यातुन 80 हजारांचे मताधिक्य द्यायचे असून हा संकल्प आपण सर्वांनी घेवूया, अशी भावना भाजपाचे नूतन जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी व्यक्त केली.
यांची होती उपस्थिती
जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारल्या नंतर सोमवारी प्रथमच ते भुसावळ तालुक्यातील पदाधिकार्यांची भेट घेण्यासाठी स्टार लॉनवर आले. यावेळी त्यांनी पदाधिकार्यांशी संवाद साधला. प्रसंगी व्यासपीठावर भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, भुसावळ विधानसभा निवडणूक प्रमुख संजय पाटील, सरचिटणीस रमाशंकर दुबे, प्रदेश कार्यकारणी सदस्या अलका शेळके, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा मनीषा पाटील यांची प्रमुख उपस्थित होती.

ताकदीने पाठीशी उभे राहणार : परीक्षीत बर्हाटे
स्व.हरीभाऊंसारखे आचार, विचार आणि संस्कार असलेले अमोल जावळे यांच्यात आम्ही स्व.हरीभाऊंनाच बघतो आहे. अभ्यासू, नम्र पण तितकेच आक्रमक असलेले अमोल जावळेंच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकदीने उभे राहू, अशी भावना शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे यांनी व्यक्त केली. अमोल जावळेंना जी जबाबदारी मिळाली आहे त्यासाठी भुसावळ तालुका त्यांच्या कायम सोबत असेल, अशी भावना तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी व्यक्त केली.
यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
सूत्रसंचालन भाजप शहर सरचिटणीस संदीप सुरवाडे यांनी तर आभार ग्रामीण सरचिटणीस दिलीप कोळी यांनी मानले. प्रसंगी प्रमोद सावकारे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेवक सुरेश देवकर, मुकेश पाटील, बापू महाजन, प्रा.दिनेश राठी, निक्की बत्रा, देवा वाणी, गिरीश महाजन, सतीश सपकाळे, गुणवंत बोरोले, पवन बुंदेले, रामदास सावकारे, किरण महाजन, किरण चोपडे, प्रशांत पाटील, अतुल झांबरे, सुनील महाजन, सदानंद उन्हाळे, समाधान पवार, गोलु पाटील, नारायण रणधीर, पुंडलिक पाटील, राजु खरारे, शंकर शेळके, कैलाश शेलोडे, अॅड.प्रकाश पाटील, अर्जुन खरारे, शिशिर जावळे, प्रशांत देवकर, प्रमोद पाटील, शंकर शेळके, मुकुंदा निमसे, अॅड.महेश तिवारी, प्रा.प्रशांत नरवाडे, धनराज बाविस्कर, राहुल तायडे, रवींद्र दाभाळे, गोलू राणे, अविनाश बर्हाटे, दिनेश दोधानी, गौतम जोहरे, नरेंद्र पाटील, भैय्या महाजन, वैभव महाजन, रवी ढगे, कैलास झोपे, सोपान भारंबे, देविदास साबळे, सचिन पाटील, प्रा.प्रशांत पाटील, डॉ.पवन सरोदे, सुमीत बर्हाटे, शेखर धांडे, प्रा.धीरज पाटील, चेतन सावकारे, भावेश चौधरी, चेतन बोरोले, लव झाडगे, श्रेयस इंगळे, कुणाल येवले, तारकेश्वर राणे, नागेश खरारे, गोपीसिंग राजपूत, अमोल पाटील, जयप्रकाश शुक्ला, संतोष ठोकळ, किरण कळसकर, नितीश इंगळे, किशोर सपकाळे, नितेश बारसे, सागर जाधव आदी उपस्थित होते.
