MLA Eknathrao Khadse तरसोद-चिखली महामार्गावर वेग मर्यादेचे फलक नसतानाही अवाजवी दंड वसुली : आमदार एकनाथराव खडसेंनी तारांकित प्रश्नाद्वारे वेधले लक्ष
Excessive fine levied on Tarsod-Chikhali highway despite no speed limit sign : MLA Eknathrao Khadse draws attention through starred question मुक्ताईनगर : तरसोद-चिखली (जि.जळगाव) या चौपदरी महामार्गावर वेग मर्यादेचे फलक लावण्याबाबत व पोलिसांकडून वेग मर्यादेचे उल्लंघण केल्याबद्दल अवाजवी दंड आकारण्यात येत असल्याबद्दल आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानपरीषदेत तारांकित प्रश्न मांडला.
फलक नसतानाही अवाजवी दंड वसुली
खडसे म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद-चिखली या नव्याने तयार झालेल्या चौपदरी महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वेग मर्यादेचे कोणतेही फलक न लावता व वाहतूक पोलिसांकडून वाहनात बसविलेल्या कॅमेरा स्पीड गण यंत्राद्वारे अवाजवी रक्कम दंड म्हणून आकारली जात आहे.
या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने महामार्गावर ठिकठिकाणी वेग मर्यादेचे फलक लावणेबाबत कोणती कार्यवाही केली तसेच अवाजवी दंड वसुल करण्यावर काय कारवाई झाली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, तरसोद-चिखली (जि.जळगाव) या चौपदरी महामार्गावर निविदा शर्तीनुसार वेगमर्यादेचे फलक लावण्यात आले असून मोटार वाहर कायद्यान्वये निर्धारीत दंड आकारण्यात येत आहे.

