भुसावळातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.नि.तु.पाटील यांनी 108 दिवसांत केली नर्मदा परीक्रमा

भुसावळ विभागातले पहिले तरुण डॉक्टर


Ophthalmologist Dr. Nitu Patil From Bhusawal performed Narmada Parikrama in 108 days भुसावळ : शहरातील भिरुड कॉलनीतील रहिवासी तथा वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयाचे संचालक डॉ.नि.तु.पाटील यांनी 108 दिवसांत नर्मदा परीक्रमा पूर्ण केली. 108 दिवसांत सुमारे 3600 किलोमीटरचा पायी प्रवास करून नर्मदा परीक्रमा करणारे ते भुसावळ विभागातील पहिले तरुण व नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टर ठरले आहेत. भुसावळातील रहिवासी व वासुदेव नेत्रालयाचे संचालक डॉ.नि.तु.पाटील यांनी 108 दिवसात माँ नर्मदा परीक्रमा यशस्वीपणे पूर्ण केली. रविवार, 23 रोजी परीक्रमा पूर्ण केल्यानंतर ते शहरात दाखल झाले. यावेळी वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सवाद्य मिरवणूक काढून परिक्रममावासी डॉ.नि.तु.पाटील यांचे स्वागत करण्यात आले.

परीक्रमा पूर्णा करणारे पहिले डॉक्टर
6 एप्रिल हनुमान जन्मोत्सव या दिवशी डॉ.नि.तु.पाटील यांनी संकल्प करीत ओंकारेश्वर येथून माँ नर्मदा परीक्रमा उचलली आणि मग तिथून चालत-चालत ते विमलेश्वर, गुजरातला गेले. त्या ठिकाणी समुद्र पार करून मिठी तलाई ते नेमावर, माँ नर्मदा उगमस्थान अमरकंटक आणि मग तिथून परत ओंकारेश्वर असा संपूर्ण 3600 किलोमीटरचा प्रवास चालत चालत 108 दिवसांत पूर्ण केला. या प्रवासामध्ये वेगवेगळे अनुभव आणि अनुभूती आले. या परीक्रमेमध्ये त्यांनी मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि छत्तीसगढची सीमा या चार राज्यांचा प्रवास केला. विविध आश्रमांना, संतांना भेटी देत त्यांच्या आशीर्वाद घेतले. त्याबद्दल सगळे विविध अनुभव त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त केले. डॉ.नि.तु.पाटील हे भुसावळ विभागातील चालत माँ नर्मदा परीक्रमा करणारे प्रथम तरुण डॉक्टर असून त्यांचे मूळगाव तळवेल येथील पायी परीक्रमा करणारे हे पहिले व्यक्ती आहेत.

यांची होती उपस्थिती
यावेळी वासुदेव जेष्ठ नागरीक संघाचे धनराज पाटील, प्रभाकर झांबरे, प्रकाश पाटील, नीलेश मालविया तसेच राजकीय पदाधिकारी प्रशांत पाटील, अतुल झांबरे, राजेंद्र चौधरी, भाजपचे शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, रमाशंकर दुबे, चंद्रशेखर झोपे, प्रदीप भंगाळे, निर्मल कोठारी, गिरीश महाजन, निक्की बत्रा, सतीश सपकाळे, प्रवीण चौधरी, मुकेश पाटील, विशाल जंगले, अशोक डाके आदी मंडळी, मित्र परिवार, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जगाच्या कल्याणासाठी परीक्रमा समर्पित
प्रापंचिक जीवन जगत असताना अध्यात्मिक अनुभूती घेणे ही एक फार मोठी साधना आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील माँ नर्मदा परीक्रमा ही एक खडतर तपश्चर्या आहे. माँ नर्मदा मातेच्या कृपेने 108 दिवसात परिक्रमा पूर्ण झाली असून ही परीक्रमा मी जगाच्या कल्याणासाठी माँ नर्मदा मातेच्या चरणी समर्पित करीत असल्याचे डॉ.नि.तु.पाटील यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !