धामणगावातील तरुणाचा खून : दोघांविरोधात गुन्हा


Murder of youth in Dhamangaon : Crime against two मुक्ताईनगर : संशयिताला महिलेसोबत विवस्त्र अवस्थेत पाहिल्यानंतर तरुणाला धमकी देण्यात आली व त्यानंतर तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळल्याची घटना तालुक्यातील धामणगाव येथे सुमारे दोन वर्षांपूर्वी घडली होती. पतीच्या मृत्यूस धमकी देणारे संशयित कारणीभूत असल्याचा आरोप करीत मयताच्या पत्नीने न्यायालयात तक्रार दाखल केली होती व न्यायालयाने 156/3 अन्वये चौकशी करून दोघांविरोधात गुन्हा करण्याचे आदेश दिल्याने मुक्ताईनगर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

असे आहे खून प्रकरण
धामणगाव शिवारातील अर्मान खॉ अब्बासखॉ यांच्या शेतातील विहिरीत गौतम उत्तम गवई (35, धामणगाव) या तरुणाचा मृतदेह आढळला होता. ही घटना 15 ते 18 डिसेंबर 2020 दरम्यान घडली होती. पतीने संशयित आरोपीला गावातील एका महिलेसोबत विवस्त्र अवस्थेत पाहिले होते व आरोपीने हा प्रकार कुणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली व ती खरी करून दाखवली, असा आरोप कविता गौतम गवई (43, धामणगाव) या महिलेने करीत न्यायालयात 156 (3) प्रमाणे तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी संशयित शेख बिसमिल्ला शेख मजीद (43) व राजेंद्र उर्फ राजू ओंकार पाटील (60, दोन्ही रा.धामणगाव, ता.मुक्ताईनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्यावरून पोलिसांनी गुरनं.274/2023, 302 प्रमाणे दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहू करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !