crypto currency किप्टो करन्सीत गुंतवणुकीद्वारे जादा नफ्याचे आमिष : रावेर तालुक्यातील दोघांची 13 लाखात फसवणूक


Lure of extra profit by investing in crypto currency : Two people from Raver taluka cheated of 13 lakhs रावेर : क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास ज्यादा नफा मिळेल, अशी थाप मारून रावेर तालुक्यातील दोघांची 12 लाख 85 हजार रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. दोन महिन्यात वारंवार संपर्क साधून दोघांकडून ही रक्कम उकळण्यात आली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

ज्यादा पैशांच्या आमिषाने फसवणूक
रावेर तालुक्यातील मोरगाव खुर्द येथील केळी व्यापारी असलेले अमोल भिका पाटील (25) यांना 27 मे ते 27 जुलै या दरम्यान सुजाता, शिवाणी, स्वाती व पिरामल असे नाव सांगणार्‍या चार जणींनी व्हॉटस्अ‍ॅप व टेलिग्राम क्रमांकावर संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केला. क्रिप्टो करंसीमध्ये आपण गुंतवणूक केल्यास अधिक नफा देऊ, असे त्यांना सांगण्यात आले. त्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी रक्कम वसूल करीत एकूण सात लाख 14 हजार रुपये उकळण्यात आले. त्या बदल्यात त्यांना कोणतीही रक्कम परत केली नाही.

अशाच प्रकारे पाटील यांचे मित्र गोविंद प्रभाकर पितृभक्त यांच्याकडूनदेखील पाच लाख 71 हजार रुपये उकळले. अशी दोघांकडून एकूण 12 लाख 85 हजार रुपये वेळोवेळी घेण्यात आले. वारंवार पाठपुरावा करून नफा तर दूरच मुद्दल रक्कमही परत न मिळाल्याने पाटील यांनी सायबर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून वरील चारही जणींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक बी.डी.जगताप करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !