दोन खाजगी ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात : सात प्रवासी ठार
Fatal accident in two private travels: Seven passengers killed बुलढाणा : दोन खाजगी ट्रॅव्हल्स बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सात प्रवासी ठार झाले असून 22 प्रवासी गंभीर जखमी झाले. मलकापूर शहरापासून जाणार्या महामार्ग सहावरील लक्ष्मीनगर उड्डाणपुलावर हा अपघात शनिवारी पहाटेच्या सुमारास घडला.
अमरनाथ यात्रेवरून परतताना अपघात
हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथील शिवाजी धनाजी जगताप हे भाविकांना घेवून अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले होते व अमरनाथ येथून दर्शन घेऊन सर्व भाविक गावाकडे परतत असताना क्रुर काळाने घाला घातला. मलकापुर -धुळे राष्ट्रीय महामार्गावर पहाटे अडिच वाजेच्या सुमारास त्यांच्या लक्झरी बसला नागपूर येथून नाशिककडे जाणार्या एका खाजगी बसने (एमएच-27-बीएक्स-4466) समोरासमोर धडक दिली. या भीषण अपघातात भाविकांच्या बसच्या समोरील भागाचा चुराडा झाला.
सात प्रवासी ठार
अपघातांमध्ये शिवाजी धनाजी जगताप (55, भांडेगाव), बस चालक संतोष आनंदराव जगताप (38, भांडेगाव), राधाबाई सखाराम गाडे (50, जयपूर), सचिन शिवाजी माघाडे (30, लोहगाव), अर्चना गोपाल घुक्से (30, डिग्रस कर्हाळे) यांच्यासह आणखी दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे तर 22 प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.



