भुसावळात संस्कृत बाल केंद्राचे औपचारीक उद्घाटन
भुसावळ : संस्कृत भारती भुसावळतर्फे लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्ताने सरल संस्कृत परीक्षा केंद्र व संस्कृत बाल केंद्राचे औपचारीक उद्घाटन प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ.किशोर अजनाडकर यांच्याहस्ते करण्यात आले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
जळगाव जिल्ह्यात संस्कृतभारतीच्या माध्यमातून अनिता जोशी, शरयु सैतवाल, गौरी धर्माधिकारी, कांचन उंबरकर, चारू भालेराव, सुनीता भंडारी (जळगाव) यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्यक्ष कार्ययोजनेचा आरंभ म्हणून डॉ.अजनाडकर यांच्या निवासस्थानी संस्कृतभारतीच्या अध्यक्ष डॉ.सुषमा खानापूरकर व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ.अजनाडकर यांनी संस्कृत भाषेतील विज्ञानवाद, वैचारीक संपत्ती येत्या पिढीला कळावा यासाठी प्रयत्नशील होण्याची गरज व्यक्त केली. डॉ.किशोर अजनाडकर, डॉ.छाया अजनाडकर, श्रीश चिपळोणकर, आशीष सैतवाल, एस.पी.पाठक, स्वाती ईखे, राजश्री देशमुख, संगीता नेवास्कर, सुषमा खानापूरकर उपस्थित होत्या.

