शेकडो वर्षांची परंपरा : यावलला पेहरण ए शरीफ उत्साहात साजरा


A tradition of hundreds of years : Yavala is celebrated in a festive atmosphere
यावल :
शहरात बुधवारी पेहरन-ए-शरीफ मोठ्या उत्साहात साजरा झाला पावसाच्या सरी बरसत असतानादेखील सर्वधर्मीय बांधवांनी सय्यदना गौसे आजम दस्तगीर यांचे पेहरन अर्थात तब्बरूक (पवित्र वस्त्र) चे दर्शन घेण्याकरीता गर्दी केली. राज्यासह शेजारील राज्यातील भाविक येथे दर्शनाकरीता मोठ्या संख्येत दाखल झाले. या उत्सवास सुमारे 100 वर्षाहून जास्त वर्षाची परंपरा आहे. दरवर्षी उर्दू वर्षानुसार मोहरमच्या 14 तारखेस हा उत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी उत्सवाचे आयोजन खिर्णीपुरा उत्सव समितीने केले.

पवित्र वस्त्राच्या दर्शनासाठी उसळली गर्दी
शहरात बुधवारी सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी बरसत असतानाच सायंकाळी शहरातील डांगपूरा येथील मन्यारवाडा येथून पेहरन अर्थात तब्बरूक (पवित्र वस्त्र) च्या मिरवणुकीला सुरवात झाली. पावसातदेखील हजारोेंच्या संख्येत भाविकांची गर्दी येथे झाली. सर्वधर्मीय बांधवांनी या ठिकाणी या पवित्र वस्त्राची सजविलेल्या डोलीतून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दाखल होत दर्शन घेतले. पवित्र वस्त्राची सजविलेल्या डोलीतून शहरातून धार्मीक गीत (नातेपाक) गात मिरवणूक काढण्यात आली. या उत्सवात राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन देखील बघायला मिळाले.

पोलिसांनी राखला चोख बंदोबस्त
मिरवणुकीदरम्यान पेहरन-ए-शरीफच्या डोलीखालून निघतांना भाविक मन्नत (मागणे) मागतांना दिसले. पेहरन-ए-शरीफ निमित्ताने संपूर्ण शहर हिरव्या पताकांनी सजवण्यात आले. व्यावसायीकांनी दुकांनावर रोषनाई केली. जिल्ह्यात मुंबई, मालेगाव, बर्‍हानपूर, सुरत, खंडवा आदी ठिकाणाावरून मुस्लीम बांधव शहरात दाखल झाले. कायदा व सुव्यवस्थेकरीता पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, सहायक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, उपनिरीक्षक अविनाश दहिफळेंह कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला. संपूर्ण उत्सवाकरीता सैय्यद युनूस, शेख कलीम शेख अमीन, रफीक खान, शेख एजाज, नुर मोहंमद गुलाम गौस,सईद शाह, गुलाम रसुल दस्तगीर, इरफान खान, शेख याकुब, इद्रीस खान, शेख रहेमान आदींनी परीश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !