पोलीस उपनिरीक्षकाचा अज्ञातांकडून निर्घृण खून


Brutal murder of police sub-inspector by unknown persons सांगोला : पोलीस उपनिरीक्षकाचा अज्ञातांनी निर्घृण खून केल्याची घटना वासुद, ता.सांगोला येथील केदारवाडी रस्त्यावर गुरुवारी पहाटे उघडकीस आली. पोलीस उपनिरीक्षक सुरज विष्णू चंदनशिवे (42) असे खून झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. मारेकर्‍यांचा यंत्रणेकडून कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

पोलीस यंत्रणेकडून संशयितांचा कसून शोध
बुधवारी रात्री 11 वाजता सुरज चंदनशिवे हे शतपावलीसाठी बाहेर पडताच केदारवाडी रोडवर अगोदरच दबा धरून बसलेल्या अज्ञात मारेकर्‍यांनी पाठीमागून डोक्यात वार करून खून केला. रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत म्हणून नातेवाईकांनी गुरुवारी सकाळी शोध घेतला असता वासूद- केदारवाडी रोडनजीक त्यांचा मृतदेह आढळला. पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी हे पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.







 

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !