बोदवडवासियांना नियमित पाणी मिळणार का ? आमदार चंद्रकांत पाटील


Will Bodwad residents get regular water? MLA Chandrakant Patil मुक्ताईनगर : मुक्ताईनगर मतदार संघातील बोदवड तालुक्यातील गावांना पाणी पुरवठा करणारी 51 गावे पाणीपुरवठा योजना ही 1995 पासुन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नावाने कार्यान्वित आहे. त्यावेळी या योजनेत प्रती माणसी 55 ते 70 लि. पाणी देण्याची तरतूद होती मात्र आता या योजनेतील पाण्याचा बोदवड तालुक्यातील गावांना तुटवडा जाणवत आहे. बोदवड तालुक्यातील नागरीकांना मुबलक पाणी मिळणार का? असा प्रश्न आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेच्या अधिवेशनात उपस्थित केला.

त्रोटक योजनेमुळे कंत्राटदाराचे चांगभलं
आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, 1 जानेवारी 2018 रोजी ही योजना पुनर्जिवित होऊन कार्यारंभ आदेश देण्यात आले परंतु या योजनेत भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा कुठलाही सारासार विचार न करता उलटपक्षी प्रती माणसी देण्याचे प्रमाण कमी करुन प्रति माणसी 40 लि. पाणी देण्याची तरतूद करण्यात आली तसेच पाणीपुरवठा यांत्रिकी विभागातदेखील अनेक त्रृटी आणि अडचणी ठेवूनही ही योजना तयार करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. केवळ कागदावर निर्माण झालेली ही अपूर्ण योजना आज रोजी बोदवडवासियांची तहान भागविण्यास अपयशी ठरली आहे. ही योजना नव्याने करणे अपेक्षित असतांना सदरील योजना पुनर्जिवित करुन योजनेची तत्कालिन जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाणी घेऊन जाणारी पाईपलाईनची क्षमतादेखील कमी करुन भविष्यातील लोकसंख्येचा विचार न करता आणि इतर असंख्य त्रृटींसह अडचणींचा सारासार विचार करण्यात आलेला नाही.

तोडक्या स्वरुपाची योजना तयार करुन कंत्राटदारांच्या घशात घालण्याच्या हेतूने त्रृटी कायम ठेवून योजना पुनर्जिवित करीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पूर्ण करीत पाच र्षे उलटूनही जि.प.ग्रामीण पुरवठा विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आली नाही. आजतागायत ही योजना सक्षमरीत्या कार्यान्वित नसल्याने आज रोजी बोदवड तालुका हा तहानलेला असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले. बोदवड तालुकावासियांना शुध्द व मुबलक पाणी पुरवठा करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

तत्काळ उपाययोजना करणार : पालकमंत्री
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की आमदारांनी मांडलेला प्रश्न खरा असून त्यांच्या मागणीनुसार नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी व उपाययोजना करण्यासाठी 4 जुलै 2023 रोजी आमदार व अधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक झाली. तत्काळ या संदर्भात उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !