ट्रकची ताडपत्री फाडून 50 हजार रुपये किंमतीचे कार्टून लांबवले
The tarpaulin of the truck was torn and the cartoon worth 50 thousand rupees was extended भुसावळ : अहमदाबादवरून नागपूर जात असताना अज्ञातांनी ट्रकची ताडपत्री फाडून 50 हजार रुपये किंमतीचे कार्टून लांबवले. वरणगाव हद्दीत हा प्रकार लक्षात आल्यानंतर अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
वरणगाव पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा
ट्रक मालक व चालक सुनीलकुमार कुसमाकर मिश्रा (43, वटवा, जि.अहमदाबाद) यांनी वरणगाव पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, 2 ऑगस्ट रोजी ते अहमदाबाद येथून नागपूरकडे ट्रक क्रमांक (जी.जे.27 एक्स.9031) अज्ञात चोरट्यांनी ट्रकची ताडपत्री फाडून मसाल्याचे 20 कार्टून लंपास केले. वरणगावजवळील हॉटेल वेस्टर्नजवळ हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने वरणगाव पोलिसांना माहिती देत तक्रार नोंदवली. तपास सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर पाटील करीत आहेत.








