वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी दहा लाखांची लाच : डीनच्या अटकेनंतर कार्यालयाची मनसेकडून तोडफोड


10 lakhs bribe for admission in medical college : Vandalism of office by MNS after dean’s arrest पुणे : पुण्यात दहा लाखांची लाच स्वीकारताना अधिष्ठाताला (डीन) रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर संतप्त मनसे सैनिकांनी संबंधित डीनच्या कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर खळबळ उडाली आहे. पुणे महापालिकेच्या नव्याने स्थापन झालेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी सोळा लाख रुपये लाचेची मागणी करून त्यातील दहा लाख रुपये स्वीकारताना डॉ.आशिष श्रीनाथ बनगिनवार (54, डीन (वर्ग-1) यास अटक करण्यात आली होती.

मनसेने केली तोडफोड
लाच प्रकरणानंतर पुण्यातील अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये मनसे आक्रमक झाली व पुण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी डीन बनगिनवारच्या ऑफिसमध्ये जाऊन संगणकाची तोडफोड केली तसेच डीनच्या खुर्चीला पैशाचा हार घालून निषेधाच्या घोषणाही दिल्या. काँग्रेसकडूनही शाई फेक आंदोलन करत काँग्रेसकडून महाविद्यालयाच्या डीनचा निषेध करण्यात आला आहे. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, ज्येष्ठ नेते मोहन जोशी आणि कार्यकर्त्यांनी डीन कार्यालयावर शाई फेकली आहे. विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन साठी लाच घेणार्‍या दिनविरोधात काँग्रेस आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.







शासकीय फी व्यतिरीक्त मागितली लाच
तक्रारदार यांचा मुलगा एनईईटी परीक्षा – 2023 मध्ये उत्तीर्ण झाला होता. त्याची एम.बी.बी.एस.च्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिला कॅप राऊंडमध्ये पुणे महापालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे इन्स्टिट्यूशनल कोट्यामधून निवड झाली होती. त्यासाठी 22 लाख 50 हजार रुपये इतके प्रवेश शुल्क होते. मात्र महाविद्यालयाचे डीन त्यांनी 16 लाख रुपये लाचेच्या स्वरूपात मागितले होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !