मुलीने वडिलांनाच केली मारहाण : कारण वाचून बसेल तुम्हालाही धक्का


The daughter beat up the father : You will also be shocked to read the reason पंढरपूर : प्रियकराच्या मदतीने प्रेयसीने आपल्या वडिलांना बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.ही घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात घडली आहे. साक्षी शाह असे मारहाण करणार्‍या मुलीचे तर वडील महेंद्र शहा यांना बेदम मारहाण केली आहे. प्रेम विवाहाला परवानगी न दिल्यानं मारहाण केल्याचे समोर आले.

असे आहे मारहाण प्रकरण
मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास माढ्यातील प्रसिद्ध व्यापारी महेंद्र शहा हे शेटफळ येथून आपल्या मुलीला माढ्याकडे घेऊन येत होते. यावेळी वडाचीवाडी गावाजवळ बाथरुमसाठी गाडी थांबवली. यावेळी अज्ञातांनी शहा यांना जबर मारहाण सुरू केली. यात ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सोलापुरातील रुग्णालयात दाखल केले. दुसर्‍या दिवशी सकाळी मुलगी साक्षी हिने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी यावेळी घटनेची चौकशी केली. पोलिसांनी संशयीतांना अटक केली. यावेळी पोलिसी खाक्या दाखवताच संपूर्ण कटाचा उलघडा झाला.







प्रेम विवाहाला वडिलांचा विरोध होता त्यांना जायबंदी करून विवाह करण्याचा कट रचला आणि त्यानुसार हे कृत्य केले असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी साक्षी शहा, चैतन्य कांबळे, आतीश लंकेश्वर, रामा पवार,बंडू उर्फ आनंद जाधव, मयूर चंदनशिवे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !