अकोला एलसीबीची धाडसी कामगिरी : भुसावळ, जळगावसह बुलढाणा जिल्ह्यातून चोरी केलेल्या 41 दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जाळ्यात


Brave performance of Akola LCB: Inter-district gang caught in Bhusawal, Jalgaon along with 41 stolen bikes from Buldhana district अकोला : अकोला एलसीबीने दुचाकी चोरट्यांच्या टोळीला बेड्या ठोकत त्यांच्याकडून 25 लाख रुपये किंमतीच्या 41 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. चोरट्यांनी अकोला, बुलडाणा, भुसावळ आणि जळगाव जिल्ह्यातून या दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे.

अकोला गुन्हे शाखेची धाडसी कारवाई !
पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव व पथकातील अंमलदार यांनी रामदास पेठ पोलिस ठाण्याअंतर्गत एका मोटारसायकल चोरीचा तपास सुरू केला. तांत्रीक व गोपानिय माहिती आधारे तपास करीत हे पोलिस पथक मुक्ताईनगर (जि.जळगाव) परीसरापर्यंत पोहोचले. येथून मेहराजशाह मुसाशाह (32, रा.वरणगाव, ता.भुसावळ, जि.जळगाव) यास ताब्यात घेण्यात आले. पोलिसात त्याने 13 मोटारसायकली चोरल्याचे समोर आले त्यामुळे गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कैलास भगत व पथकातील अंमलदार यांनी पोलीस स्टेशन बाळापूर एका चोरीच्या गुन्हयाचा तपास करीत आरोपी माने त्रिलोक सोपीनाथ खंडेराव (22, वॉर्ड नंबर 2, भीमनगर, बुलडाणा) यास ताब्यात घेतले असता त्याने बाळापूर वाडेगाव परीसरात बर्‍यााच चोरीच्या गाड्या विक्री केल्याचे समोर आले. थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अमलदार यांनी त्रिलोक सोपीनाथ खंडेराव यास ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला. पातुर, बाळापुर परीसरातुन त्याने चोरी केल्याची कबुली दिल्याने आरोपी त्रिलोक सोपीनाथ खंडेराव याचेकडून मिळाल्यानंतर आरोपीकडून वेगवेगळ्या कंपनीच्या एकूण 28 मोटर सायकली जप्त केल्यात.







आंतरजिल्हा मोटारसायकल टोळीचा पर्दाफाश !
आंतरजिल्हा टोळी सक्रीय असल्याचे समोर आल्यामुळे संशयित आरोपी मेहराज शाह मुसाशाह, (रा. वरणगाव), मामे त्रिलोक सोपीनाथ (रा. वार्ड 2 भिमनगर, बुलढाणा) या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींजवळून 41 मोटर सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांची एकूण किमंत अंदाजे पंचवीस लाख आहे. पोलीस स्टेशन रामदासपेठ, सिव्हील लाईन, चान्नी, बाळापुर तसेच बुलढाणा, जळगाव जिल्हयातील मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, पोलीस निरीक्षक शंकर शेळके, कैलास भगत, मुकंद्र देशमुख, आकाश मानकर, अभिषेक पाठक, दत्तात्र ढोरे, विशाल मोरे, अब्दु यु अहमद, रवि खंडारे, अमोल पिके, संतोष दाभाडे, महेद्र मलीय, प्रशांत कमलाकर, प्रशांत लोखंडे यांनी केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !