मुक्ताईनगर तालुका खुनाने हादरला : पैशांच्या वादातून भावानेच केला खून
Muktainagar taluka rocked by murder : The brother committed the murder due to a money dispute मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यात भावानेच भावाचा डोक्यात दगड टाकून खून केल्याची धक्कादायक घटना पिंप्रीपंचम येथे उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घटनेत मुखा मानकू शिंदे (45, पूर्णाड वस्ती, ता.मुक्ताईनगर) यांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी संशयित लहान भाऊ पंढरी मानकू शिंदे (पूर्णाड वस्ती, ता.मुक्ताईनगर) यास अटक करण्यात आली.
पैशांच्या वादातून भाऊ झाला वेश्री
मुखा मानकु शिंदे (45, रा.पूर्णाड वस्ती, ता.मुक्ताईनगर) हे परीवारासह वास्तव्यास होते. लहान भाऊ पंढरी शिंदे (40) हा काही दिवसांपासून त्याला पैसे मागत होता मात्र पैसे न दिल्यानंत गुरुवार, 10 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा ते साडेसात वाजेच्या दरम्यान दोघांमध्ये पुन्हा पैसे मागितल्याच्या कारणावरून वाद झाला. हा वाद पिंप्री पंचम गावातील भागवत धनु यांच्या शेतामध्ये झाला. यावेळी दोघांमध्ये हाणामारी झाली. यावेळी लहान भाऊ पंढरी शिंदे याने मोठा दगड मोठ्या भावाच्या डोक्यावर मारल्याने तो गंभीर जखमी झाला. आजुबाजूच्या लोकांनी धाव घेत त्यांचे भांडण सोडवले. जखमी मुखा शिंदे यांना दवाखान्यात हलविले. मात्र मार गंभीर असल्यामुळे त्याला मुंबई येथे मोठ्या दवाखान्यात हलवण्यासाठी सांगण्यात आले. तेथून मुंबई येथे जात असताना उपचारादरम्यान मुखा शिंदे यांचा मृत्यू झाला.






खून प्रकरणी आरोपीला अटक
मुक्ताईनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करीत तपास केला. त्यानंतर मयत मुखा शिंदे यांचा मुलगा दगडू मुखा शिंदे (20) यांच्या फिर्यादीवरून खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी पंढरी शिंदे याला अटक करण्यात आली आहे. तपास सहाय्यक निरीक्षक संदीप दूनगहू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे करीत आहेत.


