भुसावळातील विवाहितेचा छळ : पतीसह तिघांविरोधात गुन्हा
Harassment of married woman in Bhusawal : Crime against husband and three
भुसावळ : शहरातील माहेर व नाशिक येथील सासर असलेल्या विवाहितेने माहेरून पैसे न आणल्याने तिचा छळ करण्यात आला तसेच तिला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, पतीसह तिघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्याविरोधात गुन्हा दाखल
ऐश्वर्या स्मितेश माने (संतधाम, जामनेर रोड, भुसावळ) या विवाहितेच्या तक्रारीनुसार, पतीसह सासरच्यांनी माहेरून पैसे आणावेत म्हणून छळ केला तसेच मागणी पूर्ण न झाल्याने मारहाण केली तसेच आई-वडिलांसह भावाला शिविगाळ केली. याप्रकरणी पती स्मितेश रमेश माने, सासू मीना रमेश माने, सासरे रमेश शंकर माने (शरणपूर रोड, मातृछाया, नाशिक) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक शशिकांत महाले करीत आहेत.








