यावल शहरात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग


A 16-year-old minor girl was molested in Yaval city यावल : यावल बसस्थानकासह विविध भागात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा शहरातीलच रहिवाशी मुलाने पाठलाग करून व तिच्या आईला धमकी देऊन विनयभंग केला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पीडित 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

पाठलाग करीत केला विनयभंग
यावल शहरातील बसस्थानक परीसरात शिक्षणासाठी शहरातील एक अल्पवयीन मुलगी ये-जा करते. या मुलीचा तिच्या घरापासुन येतांना व बसस्थानकावर शहरातील खिर्णीपुरा भागातील एका मुलाने सतत पाठलाग करून तिला त्रास दिला. याबाबत तिची आई मुलास बोलण्यास गेली असता त्या मुलाने तिच्या आईलादेखील धमकी दिली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंग तसेच बालकांचा लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे करीत आहे.







 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !