रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाचा अपघाती मृत्यू


झाल्टा फाट्यावरील घटना ; बहिण गंभीर जखमी

औरंगाबाद : स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी शाळेत जाणार्‍या भावंडांना चारचाकीने धडक दिल्याने भावाचा मृत्यू झाला तर बहिण गंभीर जखमी झाल्याची घटना झाल्टा फाट्यावर घडली. रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीपासून भाऊ दुरावल्याने हळहळ व्यक्त होत आहे. संभाजी ज्ञानेश्वर शिंदे (9) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. तर श्रावणी शिंदे (11) असे गंभीर जखमी मुलीचे नाव आहे. अपघातानंतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी संभाजीला मृत घोषित केले. तर श्रावणीवर उपचार सुरू आहेत. भरधाव वेगाने बहीण भावाला उडवल्याची माहिती समजताच संतप्त स्थानिकांनी रास्तारोको केला. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक अन्य मार्गाने वळवली.


कॉपी करू नका.