कौशल्य आधारीत शिक्षण ही बदलत्या काळाची गरज : डॉ.एस.एम. गायकवाड

भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात राष्ट्रीय परीषद


Skill-based education is the need of the changing times: Dr. S.M. Gaikwad भुसावळ : नवीन शैक्षणिक धोरणानुसार लागू होणार्‍या विविध बदलत्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारीत शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही. प्रत्येक विद्यार्थ्याने सजग राहून संशोधन वृत्ती जोपासणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात मंगळवार, 17 ऑक्टोबर 2023 रोजी ‘न्यू फ्रन्टीयर्स ईन बायोलॉजीकल सायन्सेस एनएफबीएस 2023’ या विषयावर आयोजित परीदेत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील प्रा.डॉ.एस.एम.गायकवाड यांनी केले. वनस्पती आणि प्राणीशास्त्र विषयातील नोकरीच्या संधी, संशोधनाचे नवीन विषय यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. या परीषदेत संपूर्ण भारतातून एकूण 125 संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. यापैकी 54 संशोधकांनी आपल्या शोधनिबंधाचे वाचन केले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजयकुमार नाहाटा, प्रा.डॉ.एम.बी.पाटील, प्राचार्य प्रा.डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी, अधिसभा सदस्य प्रा.ई.जी.नेहेते तसेच संयोजन समिती प्रमुख प्रा.डॉ.विद्या पाटील, प्रा.डॉ.मनोजकुमार जाधव यांची उपस्थिती होती.


पोस्टर-पीपीटी प्रेझेन्टेशन निकाल
परीरषदेत शोध-निबंध स्पर्धेमध्ये उत्कृष्ट सादरीकरणासाठी पोस्टर प्रथम- खुशबू तडवी, द्वितीय- शेख मेहवीश मो.सलीम व प्रज्ञा साळुंखे, तृतीय- शेख उझ्मा नाज शेख इकबाल तसेच पीपीटी प्रेझेन्टेशन सादरीकरणासाठी प्रथम- प्रा.डॉ.एस.वाय.पाटील, द्वितीय- प्रा.डॉ.आनंद जाधव तसेच तृतीय- प्रा.डॉ.एम.एस.पाटील यांना पारीतोषिक देण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा.डॉ.एम.बी.पाटील, प्रा.डॉ.पी.आर.महाजन, प्रा.डॉ.एस.ए.पाटील, प्रा.डॉ.तन्वीर खान यांनी परीक्षण केले. प्रास्ताविक परीषदेचे समन्वयक प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील यांनी तर सूत्रसंचालन प्रा.ज्योती जंगले यांनी केले. प्रथम सत्राचे आभार प्रदर्शन प्रा.डॉ.एम.जे.जाधव, तर द्वितीय सत्राचे आभार प्रदर्शन प्रा.डॉ.विद्या पाटील यांनी मानले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !