प्रात्यक्षिकातूनच गणित शिकण्यासाठी भुसावळातील विद्यार्थ्यांनी तयार केली साहित्य निर्मिती
The students of Bhusawal have created a material to learn mathematics through demonstration भुसावळ : विद्यार्थ्यांना गणितीय संकल्पना सहज व सोप्या पद्धतीने समजण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने गणितासाठी दहा दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील विविध क्लिष्ट वाटणार्या संकल्पना प्रात्यक्षिकातून सहज शिकता येईल, असे साहित्य तयार केले. या साहित्याची प्रदर्शनी के.नारखेडे विद्यालयाच्या सभागृहात लावण्यात आली.
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ भुसावळ संचलित तु.स.झोपे गुरुजी प्राथमिक विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या साहित्याचे प्रदर्शनाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, संस्थेचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, जॉ.सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, सदस्य विकास पाचपांडे मुख्याध्यापक सुनील किसन वानखेडे यांच्याहस्ते करण्यात आले.

गणित प्रदर्शनाने पालक भारावले
विविध भौमितीक आकृत्या ओळखणे, लहान-मोठी संख्या, बेरीज-वजाबाकी, गुणाकार व भागाकार या क्रिया तसेच विविध आकर्षक साहित्यामधून विद्यार्थ्यांच्या खेळण्यासोबतच त्यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी व आवड निर्माण होण्यासाठी साहित्य विद्यार्थ्यांनी तयार केले. या साहित्याची माहिती जाणून घेण्यासाठी पालकांनी भेट दिली. विद्यार्थ्यांना सहजगत्या गणित शिकता येते याची माहिती विद्यार्थ्यांनी दिल्याने पालक भारावून गेले होते.
क्लीष्ट संकल्पना केल्या सोप्या
क्लिष्ट वाटणार्या संकल्पना सोप्या हसत-खेळत शिक्षण देण्यासाठी विद्यार्थ्यांना दहा दिवस गणित या उपक्रमांतर्गत विविध शैक्षणिक साहित्य तयार करून घेतले. या साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थी खेळातून क्लिष्ट वाटणार्या संकल्पना समजावून घेतात व इतरांशी चर्चा करून कठीण वाटणारी गोष्ट सोपी होत असल्याने विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतात, असे मुख्याध्यापक सुनील वानखेडे म्हणाले.


