जळगावात 23 वर्षीय तरुणीचा विनयभंग करीत मारहाण
A 23-year-old girl was molested and beaten in Jalgaon जळगाव : वाद मिटवण्याच्या बहाण्याने घरी बोलावलेल्या 23 वर्षीय तरुणीला मानेजवळ चावा घेत मारहाण करीत विनयभंग करण्यात आल्याची घटना निवृत्ती नगरात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
घरी आलेल्या तरुणीला मारहाण
जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणार्या 23 वर्षीय तरुणीला डिगंबर उर्फ सुनील जानकीराम चौधरी (रा.निवृत्तीनगर) याने सोमवार, 23 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता संपर्क साधला. मला सर्व मिटवायचे असून तू घरी असे सांगून विवाहितेला घरी बोलविले. 23 वर्षीय तरुणी त्याच्या घरी गेली असता काही समजण्यापूर्वीच त्याने तरुणीच्या तोंडावर मारले व तिचा विनयभंग केला. तु मला हवी आहेस, असे संशयित ओरडताच त्याची आई व भाची घरातून बाहेर आली. यावेळी महिलेने संशयिताच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न केला असता तिचे कपडेही या तरुणाने फाडले. याप्रकरणी महिलेने रात्री आठ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिल्यानंतर डिगंबर उर्फ सुनील चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार वंदना राठोड करीत आहेत

