ठार मारण्याची धमकी देत जामनेर तालुक्यातील 25 वर्षीय विवाहितेवर बलात्कार
A 25-year-old married woman of Jamner taluka was raped while threatening to kill her जामनेर : जामनेर तालुक्यातील एका गावातील 25 वर्षीय शेतमजूर विवाहितेला तसेच तिच्या मुलांना ठार मारण्याची धमकी देत संशयिताने बलात्कार केला. याप्रकरणी इम्रान फिरोज शहा (जामनेर तालुका) याच्याविरोधात पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पतीला शिविगाळ करीत केली मारहाण
जामनेर तालुक्यातील एका गावात 25 वर्षीय पीडीता पती व मुलांसह वास्तव्यास आहे. 27 रोजी पहाटे चार वाजता संशयित इम्रान शहा याने अनधिकृतपणे महिलेच्या घरात प्रवेश करीत तिला व मुलांना ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार केला. फिर्यादीच्या पतीने सोडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यास हातावर चावा घेत शिविगाळ करण्यात आली. याप्रकरणी पीडीतेने तक्रार दिल्यानंतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहेत.

