वरणगावात बसवर दगडफेक ; पाच वर्षीय बालिका जखमी
संशयिताला अटक : बसच्या काचा फुटल्या : वाहकालाही मारहाण
Stone pelting on a bus in Warangaon; A five-year-old girl was injured भुसावळ : मेहकर-भुसावळ बसवर एकाने वरणगावनजीकच्या सातमोरी पुलाजवळील हिना पार्कजवळ दगडफेक केल्याने बसमधील एक पाच वर्षीय बालिका जखमी झाली तर बसच्या दोन काचा फुटल्या. ही शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. संशयीताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली.
दगडफेकीत बालिका जखमी
मेहकर-भुसावळ बस (एम.एच. 40 एन.9941) ही मेहकरवरून भुसावळला येत असतांना शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास विशाल संजय बोंडे हा महामार्ग क्रमांक सहावरील हॉटेल आमत्रंणजवळ दुचाकी (क्रमांक एम.एच.19 डी.आर 5043) वर मोबाईलचे हेड फोन लावुन बसच्या पुढे आला व दुचाकी आडवी लावू शिविगाळ करू लागल्याने त्यास समजवण्यासाठी गेल्यानंतर त्याने दगडफेक सुरू केली.


या घटनेत बसचे दोन काच फुटले तसेच बसमधील प्रवाशी देवांशी स्वप्नील सुलताने (5, गुंजखेडा, ता.लोणार, जि.बुलढाणा) या बालिकेच्या डोक्यावर दगड लागल्याने ती गंभीर जखमी झाली. संशयित विशाल बोंडे याने वाहक पिंगळे यांना सुद्धा मारहाण केली. याप्रकरणी बस चालक योगेश यशवंत सांवळे (39, खेडी बुद्रूक, ता.भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून विशाल बोंडे याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक आशिषकुमार अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नागेंद्र तायडे करीत आहे. संशयीत आरोपीला अटक करण्यात आली.