लग्नाच्या आमिषाने चोपडा तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार
A minor girl in Chopra taluka was assaulted on the lure of marriage चोपडा : महाविद्यालयीन शिक्षण घेताना झालेल्या ओळखीचे प्रेमात रुपांतर झाल्यानंतर तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून छत्रपती संभाजी नगर येथील रहिवासी असलेल्या व मूळच्या चोपडा तालुक्यातील रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केला व त्यातून 16 वर्षीय पीडीता गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी पीडीतेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवम पाटील (पत्ता माहित नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
ओळखीचे झाले प्रेमात रुपांतर
मार्च 2023 मध्ये पीडीत मुलगी ही एका कॉलेजमध्ये इयत्ता 11 वी मध्ये शिक्षण घेत असतांना तिची ओळख संशयित शिवम पाटील सोबत झाली. यानंतर दोघांचे प्रेमात रुपांतर झाले. पीडीत मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शिवमने मित्राच्या घरी नेत त्या ठिकाणी पीडीतेची इच्छा नसतांना तिच्यासोबत वेळोवेळी शारीरीक संबंध ठेवल्याने पीडीता गर्भवती राहिली. सन 2023 मधील मार्च महिना ते सप्टेंबर 2023 दरम्यान पीडीतेवर अत्याचार करण्यात आल्याचे पीडीतेने सिडको पोलीस स्टेशन (छत्रपती संभाजीनगर) येथे दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. ही तक्रार चोपडा पोलिसांकडे अधिक तपासार्थ वर्ग करण्यात आली. तपास चोपडा शहरचे सहाय्यक निरीक्षक सहाय्यक निरीक्षक संतोष चव्हाण हे करीत आहेत.

