गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे मंगळसूत्र चोरीला
चोपडा स्थानकातील घटना : सीसीटीव्हीद्वारे चोरट्याच शोध
Taking advantage of the crowd, the mangalsutra of the old man was stolen चोपडा : बसमधील प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत भामट्याने बसमध्ये चढत असतांना वृध्देच्या गळ्यातील 57 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लांबवल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी चोपडा शहर पोलिासत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा
सिंधूबाई छगन पाटील (75, गणपूर, ता.चोपडा) या वृध्दा शनिवार, 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास चोपडा येथून गणपूर गावात जाण्यासाठी चोपडा बसस्थानक आवारात आल्या असता चोपडा गणपूर बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 57 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र लांबवले. ही बाब लक्षात येताच त्यांनी सर्वत्र शोध घेतला परंतू मंगळसूत्राचा तपास न लागल्याने त्यांनी तातडीने चोपडा शहर पोलिसात तक्रार नोंदवली. तपास हवालदार हरीष पवार करीत आहे

