जळगावात 14 वर्षीय मुलीचा विनयभंग : जाब विचारणार्‍या कुटूंबाला पिता-पूत्रांना मारहाण


14-year-old girl molested in Jalgaon : Father and son beat up the family who asked for answers जळगाव : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत जाब विचारणार्‍या कुटूंबाला मारहाण करण्यात आली. ही घटना शाहू नगर परीसरात शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात पिता-पूत्रासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन महिन्यांपासून पाठलाग
जळगाव शहरातील शाहू नगरातील खान्देश मिल कॉलनी परीसरात 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी परीवारासह बांधकामाच्या ठिकाणी वास्तव्यास आहे. याच परीसरातील मीत सुनील पटेल, चेतन सुनील पटेल हे दोघे काही महिन्यांपासून अल्पवयीन मुलीची अश्लिल हावभाव करीत छेड काढत असल्याचा आरोप आहे. शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पीडीता रस्त्याने घरी जात असतांना संशयीत मित सुनील पटेल आणि चेतन पटेल हे दोघांनी तिला आवाज देवून जवळ बोलाविले. नंतर तिचा हात पकडून विनयभंग केला.



पीडीत मुलीने हाताला झटका मारून घर गाठत हा प्रकार कुटुंबाला सांगितला. याचा जाब विचारण्यासाठी पीडीत मुलीचे आई-वडील गेले असता संशयित मीत पटेल, चेतन पटेल व त्यांचे वडील सुनील पटेल व त्यांचा अनोळखी एक मित्राने वडीलांना शिवीगाळ करत मारहाण केली तसेच मुलीच्या आईच्या अंगावर विटांनी मारहाण केली. या मारहाणीत कुटूंबीय जखमी झाले. याप्रकरणी पीडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशीरा जिल्हापेठ पोलिसात मीत सुनील पटेल, चेतन सुनील पटेल, सुनील पटेल आणि एक अनोळखी अशा चौघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !