पायी चालताना आला अचानक हृदयविकाराचा झटका : जळगावातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू


Sudden heart attack while walking: Unfortunate death of young man from Jalgaon जळगाव : पायी चालत असताना अचानक ह्रदयविकाराचा झटका आल्याने अयोध्या नगर परीसरातील 34 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवार, 30 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वयाच्या सुमारास अजिंठा चौकात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विशाल विठ्ठल वाणी (34, रा.अयोध्यानगर, जळगाव) असे मयताचे नाव आहे.

अचानक आला हृदयविकाराचा झटका
विशाल वाणी हा तरुण सोमवार, 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजता जळगाव शहरातील अजिंठा चौफुली जवळून जात असताना अयोध्यानगरकडे जाणार्‍या रस्त्यावर त्याला ह्रदयविकाराचा झटका आला व तो खाली कोसळला. त्यावेळी एका जणाने तरुणाच्या खिशातील पाकीटामध्ये असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली. त्यावेळी तरुणाचे नातेवाईक व एमआयडीसी पोलिसही तेथे पोहचले. दरम्यान तरुणाला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !