गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतूसासह संशयित जळगाव शहर पोलिसांच्या जाळ्यात
Gavathi pistol, suspect with two live cartridges in Jalgaon city police net जळगाव : गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूस बाळगून दहशत निर्माण करणार्या संशयिताच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. रविवार, 29 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात यशवंत नामदेव पाटील (47, रा. शिवाजीनगर, हुडको, जळगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शिवाजीनगर हुडको परीसरात संशयित गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती रविवार, 29 ऑक्टोबर रोजी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली. त्यावरून त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार दुपारी चार वाजता हवालदार उमेश भांडारकर, तेजस मराठे, योगेश इंधाटे, अमोल ठाकूर यांना संशयित यशवंत पाटील हा मद्याच्या नशेत गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याचे दिसताच त्यास ताब्यात घेण्यात आले.


संशयिताकडे दोन जिवंत काडतूस व कट्टा असल्याने तो जप्त् करण्यात आला. याप्रकरणी कॉन्स्टैबल योगेश इंधाटे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार उमेश भांडारकर करीत आहेत.