विनयभंगाच्या आरोपाने व्यथित जळगावातील ग्रंथालय परीचराची रेल्वेखाली आत्महत्या


A library assistant in Jalgaon, distressed by allegations of molestation, commits suicide under the train जळगाव : शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालय ग्रंथालयाचे परीचर कैलास दत्तात्रय कडभाने यानी धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. ही धक्कदायक घटना बुधवार, 1 रोजी दुपारी म्हसावद शिरसोली डावून रेल्वे लाईनवर घडली. दरम्यान, मंगळवारी एका विद्यार्थिनीने कडभाने यांच्याविरोधात विनयभंग केल्याचा आरोपाखाली तक्रार दाखल केली होती व रामानंद पोलिसात याप्रकरणी मंगळवारी गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता.

कुटूंबियांचा आक्रोश मन हेलावणारा
जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी दिनेश पाटील, लिलाधर महाजन,संजय भालेराव, अनिल मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत कैलास कडभाने यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला. कुटुंबियांनाी व नातेवाईकांनी मृतदेह पाहून मोठा आक्रोश केला.



दरम्यान, एका विद्यार्थीनीने परिचर कैलास कडभाने यांच्याविरुध्द मंगळवार, 31 रोजी रामानंदनगर पोलिसात विनयभंग केल्याची तक्रार दिली होती व गुन्हा दाखल झाल्यानंतर नैराश्यातून बुधवार, 1 रोजी दुपारी कैलास कडधाने यानी शिरसोली-म्हसावद डावून लाईनवर खांबा क्रं. 406/15 दरम्यान धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. मयत कडभाने यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !