जळगावातील अल्पवयीन मुलाचा विद्युत शॉक लागल्याने मृत्यू


A minor girl in Jalgaon died due to electric shock जळगाव : घराची साफ-सफाई करताना विजेच्या तारेला पायाचा स्पर्श होवून सुनील संजय चव्हाण (16, बांधकाम साईड, बोहरागल्ली) या अल्पवयीन मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला. शहरातील गणेश कॉलनीत बुधवार, 1 रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

साफसफाई करताना दुर्घटना
संजय चव्हाण हे मूळ मन्यारखेडा (भुसावळ) येथील असून ते सध्या शहरातील बोहरागल्ली येथे बांधकाम सुरू असलेल्या साईडवर कुटुंबासह वास्तव्यास आहेत. जळगावातील फटाके विक्रेते अनिल अग्रवाल यांचे गणेश कॉलनीत निवासस्थान आहे. याठिकाणी साफसफाईच्या कामासाठी संजय चव्हाण यांचा मुलगा सुनील चव्हाण तसेच त्याचा मित्र सागर शिंदे असे दोघे बुधवारी सकाळी गणेश कॉलनीत गेले. सफाईचे काम करत असताना सुनील याचा पाय जमिनीवरील विजेच्या तारेवर पडला व शॉक लागून तो जागेवर कोसळला. त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीअंती मृत घोषीत केले.



मुलाचा दुर्देवी मृत्यूची वार्ता कळताच चव्हाण कुटुंबातील सदस्यांनी रुग्णालयात आक्रोश केला. याठिकाणी उपस्थितांनी हळहळ व्यक्त करत विद्युत प्रवाह सुरू असलेली वायर जमिनीवर पडून असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. मृत सुनील याच्या पश्चात वडिल संजय, आई कांताबाई, विवाहित बहिण आरती तसेच लहान बहिण काजल असा परीवार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !