जामनेर तालुका हादरला : मुलींना ठार मारण्याची धमकी देत 25 वर्षीय विवाहितेवर बलात्कार


Jamner taluka shaken : 25-year-old married woman raped while threatening to kill girls जामनेर : मुलींना ठार मारण्याची धमकी देत जामनेर तालुक्यातील 29 वर्षीय विवाहितेवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना एका गावात उघडकीस आली. याप्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात जामनेर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मुलींना दिली ठार मारण्याची
जामनेर तालुक्यातील एका गावात 29 वर्षीय विवाहिता दोन मुली व परीवारासह वास्तव्याला आहे. 30 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजता गावातील विक्की सुरेश पाटील (25) याने पीडीतेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करीत मुलींना जीवेठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार केला. हा प्रकार 30 सप्टेंबर तसेच दोन ते तीन दिवसांनी रात्री 11 वाजता घडला. घाबरून पीडीतेने सुरूवातीला हा प्रकार कुणालाही सांगितला नाही. त्यानंतर बुधवार, 1 नोव्हेंबर रोजी जामनेर पोलिसात धाव घेवून विक्की पाटील याच्या विरोधात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच संशयित आरोपीला विक्की पाटील याला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर काळे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !