जळगावात चोरटे सैराट : बसमधील गर्दीचा फायदा घेत चोपड्यातील महिलेची पर्स लांबवली
Thieving outing in Jalgaon : Taking advantage of the crowd in the bus, a woman’s purse was stolen from the chopper जळगाव : सण-उत्सवांमुळे बसमध्ये चढताना झालेली गर्दी पाहता चोपड्यातील पार्लर चालक महिलेची भामट्यांनी पर्स लांबवली. या पर्समध्ये 50 हजार 700 रुपयांचा ऐवज होता. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गर्दीचा फायदा घेत साधली संधी
संगीता रवींद्र राणे (46, चोपडा) या पार्लर चालक असून ब्युटीपार्लरसाठी लागणार्या काही वस्तू घेण्यासाठी शनिवार, 4 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता जळगाव शहरात आल्या होत्या. वस्तू घेतल्यानंतर त्या टॉवर चौकातील जोगळेकर दुकानासमोर बसची वाट बघत उभ्या होत्या. जळगाव-चोपडा बस आल्यानंतर त्या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांची पर्स लांबवली. या पर्समध्ये 16 ग्रॅम वजनाची सोन्याची माळ, चार हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल एक हजार 700 रुपयांची रोकड होती. महिलेने तातडीने जळगाव शहर पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रफुल धांडे करीत आहेत.

