भडगावात चोरट्यांनी वृद्धेच्या पिशवीतून 53 हजार लांबवले
53,000 stolen from an old woman’s bag by thieves in Bhadgaon भडगाव : वृध्देकडील कापडी पिशवीला ब्लेड मारत त्यातील 53 हजारांची रोकड अज्ञात चोरट्याने लांबवली. ही घटना भडगाव शहरातील बँक ऑफ बडोदा जवळ घडली.
पाळत ठेवून केली चोरी
भडगाव शहरातील आझाद चौक, भोईवाडा भागातील रहिवासी राह्याबाई नामदेव भाई (67) या सोमवार, 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता बँकेत गेल्या असता बँकेतून त्यांनी 53 हजार रुपयांची रोकड काढली. त्यानंतर पैसे कापडी पिशवी ठतेवले आणि घराकडे निघाल्या. रस्त्याने पायी जात असताना पाळत ठेवून असललेया चोरट्याने त्यांच्या कापडी पिशवीला ब्लेड मारत पिशवीतील 53 हजार रुपयांची रोकड लांबवली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर वृद्ध महिलेने तातडीने भडगाव पोलिसात तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार किरण पाटील करीत आहे.

