जळगावात धाडसी घरफोडी : 90 हजारांचा ऐवज चोरीला
Daring burglary in Jalgaon : 90 thousand stolen जळगाव : शहरात चोर्या-घरफोड्यांचे सत्र कायम असून वाघ नगर परीसरातील साई संस्कार कॉलनीत घरफोडी झाल्याचे स्पष्ट आले आहे. बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 90 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोकड लांबवली. ही घटना रविवार, 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या संदर्भात सोमवार, 6 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घर चोरट्यांना पर्वणी
सलीम मेहबूब तडवी (58, साई संस्कार कॉलनी, वाघ नगर, जळगाव) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला असून खाजगी नोकरी करतात. रविवार, 5 नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वा बारा ते दुपारी तीन वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद असल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. घराचा कडीकोयंडा व कुलूप तोडून आत प्रवेश करत घरात ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच 40 हजार रुपयांची रोकड असा एकूण 90 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.


हा प्रकार लक्षात आल्यानंतर सलीम तडवी यांनी रामानंदनगर पोलिसात सोमवार, 6 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.