भुसावळातील तरुणीला पार्ट टाईम नोकरीच्या आमिषाने सहा लाखांचा गंडा


A girl from Bhusawal was extorted of six lakhs by the lure of a part-time job भुसावळ : व्हाट्सअ‍ॅप व टेलिग्राम या सोशल मीडियावर निधी व अमित असे नावे सांगणार्‍या अनोळखी दोघांनी भुसावळातील तरुणीला पार्ट टाइम जॉब देण्याचे आमिष दाखवत तब्बल पाच लाख 79 हजार 794 रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
भुसावळ शहरातील ओम पार्क परीसरातील 32 वर्षीय तरुणीला 19 ऑक्टोबर रोजीपासून व्हॉट्सअ‍ॅप व टेलिग्राम या सोशल मीडियावर निधी व अमित अशी नावे सांगणार्‍या अनोळखींनी संपर्क साधत पार्ट टाइम जॉब देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर फ्लाईट बुकिंगचे टास्क पूर्ण करण्यासाठी खाते रीचार्ज करण्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने एकूण पाच लाख 79 हजार 794 रुपये घेवून त्यांची आर्थिक फसवणूक केली.



फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने मंगळवार, 7 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता जळगाव सायबर पोलिासात तक्रार दिल्यानंतर अमित आणि निधी असे नावे सांगणार्‍या अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिसस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !