चोपडा तालुक्यातील वनरक्षक महिलेचा विनयभंग
Forest guard woman molested in Chopra taluka जळगाव : दुचाकीवर प्रवास करीत असलेल्या वनरक्षक महिलेचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात एकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
एकाविरोधात गुन्हा दाखल
चोपडा येथील रहिवासी व्यक्तीने एका वनरक्षक महिलेस आपल्या मोटार सायकलवर डबलसीट बसवून जाणून बुजून खड्यातून वाहन नेले. खड्ड्यातून मोटारसायकल गेल्यानंतर मॅडम तुम्हाला कसे वाटते ? असा अश्लिल प्रश्न त्याने केला. याशिवाय समोरुन स्पर्श झाल्यावर कसे वाटते असा पुन्हा प्रश्न केला. याशिवाय जाणूनबुजून मागे सरकून पाठीचा धक्का महिलेच्या अंगाला मारुन स्पर्श केला. या प्रकारामुळे महिलेच्या मनात लज्जा निर्माण झाली. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात वनरक्षक महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधीताविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला तपास ज्ञानेश्वर जवागे करत आहेत.

