रेल्वे प्रवाशांनो ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची : धुळे-दादर एक्स्प्रेस आता दररोज धावणार !
रेल्वेची अधिसूचना : धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांची माहिती
Railway passengers, this news is very important for you : Dhule-Dadar Express will now run daily! भुसावळ : जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल अर्थात मुंबई-धुळे एक्स्प्रेस दररोज चालवण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतल्याची माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली. ते म्हणाले की, या संदर्भात अधिसूचना काढण्यात आली आहे.
स्वतंत्र रेल्वेमुळे मोठी सोय
धुळे-मुंबई एक्स्प्रेस दररोज धावण्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. धुळ्याहून मुंबईला जाण्यासाठी स्वतंत्र रेल्वे नव्हती. धुळे-चाळीसगाव रेल्वेला दोन मुंबई बोगी लावण्यात येत होत्या. पुढे या दोन्ही बोगी अमृतसर एक्स्प्रेसला
जोडण्यात येत होत्या. मात्र, लॉकडाऊनच्या काळात ही सेवा बंद झाली होती. तेव्हापासून धुळ्याहून मुंबईला जाण्यासाठी रेल्वे नसल्याने प्रवाशांचे हाल होऊ लागले होते. त्यामुळे स्वतंत्र दोन बोगींऐवजी मुंबईसाठी मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे सुरू करावी, अशी मागणी डॉ.भामरे यांच्याकडे करण्यात आली होती.
त्यानंतर रेल्वे प्रशासनाने धुळे- दादर एक्स्प्रेस प्रायोगिक तत्त्वावर 29 एप्रिल 2023 पासून सुरू केली. ही गाडी सध्या तीन दिवस धावते.
गाडीचा क्रमांकही बदलला
नियमित होणार्या गाडीचा क्रमांकही बदलण्यात आला आहे. ही गाडी मुंबईहून दुपारी 12 वाजता सुटून रात्री 8.50 वाजता धुळ्यात पोहोचणार आहे तर धुळ्याहून सकाळी 6:30 वाजता सुटून दुपारी 2.15 वाजता मुंबईला पोहचणार आहे.


