जुगार छाप्यात पावणेदोन लाखांचा ऐवज जप्त
2 lakhs seized in gambling raid जळगाव : एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावर तीन पत्त्यांचा रंगलेल्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकत संशयितांकडून रोकडसह मोबाईल असा सुमारे एक लाख 76 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मंगळवार, 7 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जुने बसस्थानकाच्या बाजुला, लॉटरी गल्लीच्या इमारतीवर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी 25 संशयितांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात 89 हजार 760 रोकड, 6 मोबाईल किमत 87 हजार याचा जप्ती कारवाईत समावेश आहे.

